🌟त्यांनी कार्यकर्तृत्वाने कुशल कर्माने स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख अनेकांनी निर्माण केली🌟
🪷व्यक्ती आणि व्यक्तीमत्व :
लेखक - श्रीकांत हिवाळे ✍️
जाधव घराण्याची सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक बुद्ध शाहू फुले आंबेडकर विचारधारेची ऐतिहासिक व समृद्ध पार्श्वभूमी लाभलेल्या सिंदखेड राजा .राजे लखोजीराव जाधव यांचा महान आदर्श डोळ्यासमोर ठेवून सिंदखेडराजा येथील सर्व जाती-धर्माच्या समाज बांधवांनी गुण्यागोविंदाने राहून आपल्या कार्यकर्तृत्वाने कुशल कर्माने स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख अनेकांनी निर्माण केली.
त्यापैकीच बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख आंबेडकरी व धम्म विचाराचे परिवर्तन चळवळीचे विचारपीठ म्हणून ओळखले जाणारे दैनिक सम्राट चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी यष्टि कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बुद्धांच्या मंगल मैत्रीचा व दानपरामीतेचा महान आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आचरणातून कृतीतून अनेक बुद्ध विहारांना नवनिर्माणासाठी सढळ हाताने दान करणारे समाजातील शोषित पीडित वंचित गरीब जनतेसाठी त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे बाबासाहेब नागोराव जाधव बुलढाणा जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या म्हणोक्ती प्रमाणे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा या वचनानुसार निरपेक्ष भावनेने त्यांची वाटचाल सुरू आहे. करोना कालखंड स्वतःचे जीव वाचवण्यासाठी अनेकांनी स्वतःला बंदिस्त करून ठेवले होते रस्ते निर्मनुष्य होते भयानक शांतता होती.अशा कालखंडामध्ये वयाची साठी उलटलेल्या बाबासाहेब जाधवांनी विधवा परिताक्त्या महिला व गरीब समाज बांधवांच्या घरी जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य स्वतः पुढे होऊन प्रत्येकाच्या घराघरात दिले आपले पूज्य वडील बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतिशील अनुयायी सिंदखेडराजा पंचायत समितीचे पंधरा वर्षे सदस्य राहिलेले तत्कालीन मेहकर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नागोराव जाधव गुरुजी यांच्या महान विचाराचा कार्यकर्तुत्वाचा वारसा चालवण्याचं काम ते सेवाभावी वृत्तीने करत असतात.
आई विठाबाई शील सदाचार प्रेम आपुलकी जिव्हाळा व अपार कष्टाच्या प्रतीक असलेल्या त्यांनी आपल्या सर्व सुपुत्रावर सुकन्यावर चारित्र्य नीतिमत्ता सदाचार व शिक्षणाचे धडे दिले त्यामधूनच बाबासाहेब जाधव यांच्या जीवनाची जडणघडण झाली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सवना या ठिकाणी ज्येष्ठ बंधू तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यावर श्रद्धा असणारे गंगाधरराव जाधव व वहिनी लीलाताई गंगाधर जाधवत्याच विद्यालयामध्ये मराठीच्या शिक्षिका आपल्या प्रिय बंधू व वहिनीच्या शैक्षणिक संस्कारातून त्यांची जडणघडण झाली.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संभाजीनगर येथील मिलिंद विज्ञान महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला परंतु तो कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे म्हणून अनेक होतकरू अभ्यासू विद्यार्थी नामांतर आंदोलनामध्ये पडले तसे बाबासाहेब जाधव ही त्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही जेष्ठ बंधूंनी खूप समजावून सांगितले परंतु काही उपयोग झाला नाही.
त्याच कालखंडामध्ये पॅंथर नेते व आताचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवले त्यांच्या संपर्कात ते आले ओळखीचे रूपांतर परिचयात झाले व नंतर गाढ मैत्रीमध्ये झाले.पुढील काळामध्ये एसटी महामंडळामध्ये त्यांना नोकरी लागली त्यांचा विवाह जालना एस आर पी कॅम्पस मध्ये डी वाय एस पी असलेले आदरणीय पीजी इंगळे यांच्या सुकन्या विमल ताई यांच्या सोबत झाला विमल ताई त्यावेळी डीएड चे शिक्षण घेत होत्या विवाह विधी पार पडल्यानंतर काही महिन्यातच त्यांना बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकेची नोकरी लागली.
आता बाबासाहेब जाधव यांचे जीवन स्थिर झालं होतं परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये ते सक्रिय होते आपल्याला काही शिक्षण घेता आलं नाही परंतु आपल्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाला आपण उच्चशिक्षित करावं त्याला प्रख्यात डॉक्टर बनवाव ही विमलताई बाबासाहेब जाधव यांची इच्छा असं म्हटलं जातं इच्छा तिथे मार्ग याप्रमाणे त्यांनी आपुले एकुलते एक लाडके सुपुत्र डॉक्टर योगेश यांना एमबीबीएस एमडी पर्यंतचे शिक्षण दिले आता ते अमेरिकेमध्ये तेथील प्रतिथीत यश नामांकित दवाखान्यामध्ये आपल्या पत्नी डॉक्टर श्रवंती यांच्यासोबत उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देत आहेत विमलताई यांनी सुद्धा शिक्षकी पेशामध्ये कार्यरत राहून उच्च शिक्षण पूर्ण केलं त्याही एम ए एम एड झाल्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कर्तव्य भावनेने अतिशय चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी दिली.
संपूर्ण परिवार महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी महापुरुष संत यांच्या विचारावर चालताना आपणाला दिसत आहे. मानवी जीवनाचे रहस्य निष्काम सेवा आहे मरावे परी कीर्तिरूपे उरावे या संत वचनानुसार त्यांची जीवनामध्ये वाटचाल सुरू आहे अनेक राज्य पातळीवरील व देश पातळीवरील पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. ते माझे प्राणप्रिय मामा आहेत या बद्दल मला सार्थ अभिमान वाटतो नुकताच त्यांना पत्रकारितेतील समर्पित योगदानाबद्दल राज्य पातळीवर पुरस्कार जाहीर झालेला आहे आज त्यांचा वाढदिवस या मंगल प्रसंगी त्यांना व संपूर्ण परिवाराला आयू आरोग्य बल वैभव धनसंपदा प्राप्त हो ही मनोकामना पौर्णिमेच्या शीतल अल्हाददायक चंद्रमाप्रमाणे त्यांचा आयुष्य प्रकाशमान होवो ही सदिच्छा....!
शुभेच्छुक
श्रीकांत हिवाळे सर
मा.तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी.
0 टिप्पण्या