🌟बिड जिल्ह्यातील जनसामान्यांचे रेल्वे प्रवासाचे स्वप्न अखेर ३५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होणार प्रत्यक्षात पुर्ण....!


🌟बिड रेल्वे लोहमार्गावर प्रतितास १३० किलोमीटर वेगाने निरिक्षण यानातून रेल्वे चाचणी यशस्वी🌟

बीड :- बिड-अहिल्यानगर या नवीन लोहमार्गाचे काम अखेर पुर्ण झाल्यानंतर काल बुधवार दि.०५ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१.२४ वाजेच्या सुमारास नवनिर्मित बिड रेल्वे स्थानकावर देश स्वातंत्र्याच्या तब्बल ७८ वर्षाच्या कालावधी नंतर इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे पोहचली तमाम बिड जिल्ह्यातील जनसामान्यांचा मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासूनच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेले रेल्वे प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात पुर्णत्वास आले प्रतितास १३० किलोमीटर वेगाने या लोहमार्गावरील नवगण राजुरी ते बीड मार्गावर रेल्वे धावली आजपर्यंत बिड जिल्ह्यातील नागरिकांनी कित्येकदा बाहेर जिल्ह्यातून रेल्वे प्रवास केला अनुभवला आहे मात्र बीडमध्ये प्रथमच रेल्वे धावल्याने तिला पाहण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरात दुतर्फा गर्दी केली होती. अनेक तरूणांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ शुट करत सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान बीडचे खा. बजरंग सोनवणे, आ.संदीप क्षीरसागर यांनी आष्टीच्या कार्यक्रमाला पोहचायचे असल्याने सकाळी रेल्वे स्थानक परिसरात जावून रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली.

बीडमध्ये रेल्वे कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आता जिल्हावासियांना मिळाले आहे. बुधवारी नवगण राजुरी ते बीड या मार्गावर रेल्वेची निरिक्षण यानातून जलदगती चाचणी करण्यात आली. बीड रेल्वे स्थानकात रेल्वे पोहचल्यानंतर मागील अनेक वर्षांपासूनचे रेल्वेचे स्वप्न पुर्णत्वास गेल्याने बीडकरांमध्ये समाधान आणि आनंदाची भावना व्यक्त झाली. रेल्वे स्थानक परिसरात मुंबईतून आलेल्या मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानक परिसरात मंडप उभारणी करण्यात आली होती. रेल्वे निरिक्षण यानातून अधिकारी बीडमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी वृक्षसंगोपनाचा संदेश देत रेल्वे स्थानक परिसरात वृक्ष लागवड केली. त्यानंतर बीड रेल्वे समिती व इतर नागरिकांच्या वतीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा व इतरांचे स्वागत करण्यात आले. तरूणाईने रेल्वे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दि.४ व ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायं ६ या वेळेत विघनवाडी, नवगण राजुरी मार्गे बीड पर्यंत रेल्वेची जलदगती चाचणी करण्यात आली. यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी रेल्वे मार्गावर निरिक्षण केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या