🌟“ताक बनविण्यात सूक्ष्म जीवांचे योगदान” विषयावर भित्तीपत्रक🌟
पुर्णा (दि.२८ फेब्रुवारी २०२५) - पुर्णा येथील श्री गुरू बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्था संचलीत श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त “ताक बनविण्यात सूक्ष्म जीवांचे योगदान तसेच ताकाचे आरोग्यासाठी महत्व” समजावून सांगणारे भित्तीपत्रक सादर करण्यात आले. “ताक पिऊ या आणि सुदृढ राहुया” या संकल्पनेवर आधारित सदरील भित्तीपत्रकांत ताक बनविण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव तसेच ताकाच्या विविध फायदेशीर गुणधर्मांचा आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचा सखोल विवेचन करण्यात आले. भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ .शिवसांब कापसे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ.संजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना कु. सानिका वळसे या विद्यार्थीनीने केली. भित्तीपत्रकात ताकाच्या पचनसंस्थेसाठी होणाऱ्या फायदे, शरीरातील जिवाणूंचे संतुलन राखण्यासाठी ताक कसे मदत करते, आणि त्यामध्ये असलेल्या लॅक्टोबॅसिलस तसेच इतर द्रवपदार्थांमुळे शरीराला मिळणारे आरोग्य लाभ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. दैवशीला कमठाणे आणि डॉ. रवींद्र राख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या भित्तीपत्रकात, ताकाचे नियमित सेवन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ताकामुळे पचनप्रक्रिया सुधारते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आणि हाडांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते या भित्तीपत्रकाचे आयोजन विद्यार्थ्यांना सुक्ष्मजीवशास्त्राच्या दृष्टीने नव्या माहितीची व सखोल विचारांची प्राप्ती करण्याची संधी प्रदान करणार आहे. तसेच, ताकाच्या आरोग्यविषयक फायदे विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करतील. भित्तीपत्रके बनवण्यासाठी शुभांगी काकडे आणि अबोली सोनुले यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन कु. पायल राजभोज या विद्यार्थीनीने केले.
यावेळी महाविद्यालयातील डॉ. पल्लवी चव्हाण,डॉ.जयश्री स्वामी यांनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले शुभांगी काकडे,सानिका वळसे, अबोली सोनुले, पायल राजभोज,साक्षी वळसे, प्रेरणा धुतराज,आरती धुतराज,नंदिनी गायकवाड,फेरहिन इरम शेख,आलिया सय्यद, प्रतिक्षा कसारे, स्नेहा मोरे, आणि संजीवनी धुतराज या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढे चहा आणि कॉफी न पिता ताक पिण्यास सांगितले. या नंतर महाविद्यालयाच्या उपहारगृहात ताक मिळण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना ताक पिण्यास दिले गेले. ताक वाटून जनजागृती केली या भित्तीपत्रकाच्या आयोजनासाठी कालिदास वैद्य, गजानन भालेराव आणि भागुसिंग बायस यांनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या