🌟परभणी येथील डॉ.राहुल पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रात अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी.....!


🌟रुग्णालयातील डॉक्टरांनी ०६ वर्षीय मुलीला दिले जीवनदान🌟

परभणी :- परभणी शहरातील पाथरी रोडवरील डॉ.राहुल पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रात मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबीरा अंतर्गत तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी व अत्यंत अल्पदरात सर्व तपासण्या व उपचार करण्यात आले. एक लहान मुलगी पोट दुखत असल्याने उपचारासाठी आली होती या लहान मुलीची प्राथमिक तपासणी करण्यात आली.

आर.पी.रुग्णालय व संशोधन केंद्र येथे सातत्याने मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहेत. महाआरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उ‌द्घाटन महावि‌द्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध आजारांच्या ५०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.

शिबिरातील काही रुग्णांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यापैकी एका रुग्णाची आतड्याची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु हा रुग्ण या शिबिरात उपस्थित राहिला आणि रुग्णालय प्रशासनाने त्याची नाजूक शारीरिक व आर्थिक परिस्थितीची बाब लक्षात घेऊन अत्यंत अल्पदरात त्याची अत्याधुनिक तंत्रज्ञाना‌द्वारे शस्त्रक्रिया केली. सहा वर्षाच्या चिमुकलीच्या पोटामध्ये छोटी आतडी ही मोठ्या आतडी मध्ये अडकली होती व त्यामुळे पोटामध्ये गोळा तयार झाला होता हा गोळा काढण्यासठी अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया करून तो गोळा काढून सदरील लहान मुलीला जीवनदान देण्यात आले.

हा आजार प्रत्येकी १००० रुग्ण्यामधील १ किंवा २ रुग्णामध्ये आढळून येतो. अशी अवघड शस्त्रक्रिया आर पी हॉस्पिटल येथे करण्यात आली शस्त्रक्रिया केल्यानंतर ०६ दिवसांनी रुग्णाला सुट्टी देण्यात आली. ही शस्त्रक्रिया आर.पी हॉस्पिटल येथील प्रसिध्द शल्यचिकित्सक तज्ञ डॉ. आमिर खान यांनी केली. तसेच डॉ. श्रुती सहारे, भूलतज्ञ डॉ. वांगीकर, कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. शिवानी, डॉ. उर्वशी, ओटी सहकारी संध्या आळणे, किशोर नवले आदी यांनी सहकार्य केले.

यांनी पार पाडली. या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयीन प्रशासनाचे आभार मानले. आर पी हॉस्पिटल येथे अश्या अनेक प्रकारच्या शस्त्र्याक्रिया करण्यात येत आहेत तसेच अत्याधुनिक सुविधा जसे कि,२४ तास पॅथॉलॉजी,२४ तास आपत्कालीन सेवा, देण्यात येत आहेत. आमदार डॉ. राहुल पाटील व आर पी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी जास्तीत जास्त गरजू लोकांनी अल्पदरातील उपचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या