🌟याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु🌟
नांदेड :- नांदेड शहरातील गणेशनगर परिसरात आज बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे आज बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास गणेश नगर परिसरात ३० वर्षीय तरुण अमोल भुजबळ उर्फ एमजे हा एका दुकानावर खरेदी करीत असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने अमोल भुजबळ याच्यावर सपासप जबरदस्त वार केले जीव वाचविण्यासाठी तो जखमी अवस्थेत पळत जात गणेशनगर वाय पॉईंटजवळ जमिनीवर कोसळला आरोपींनी त्याचा पाठलाग करुन पुन्हा वार केले या हल्ल्यात अमोल भुजबळ हा जागीच मरण पावला घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिस स्टेशनला देण्यात आली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव,पोलिस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्यासह शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हल्लेखोर हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत अमोल भुजबळ हा खोब्रागडेनगर येथे राहत होता. या घटनेनंतर गणेशनगर - व वाय पॉइंट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.....
0 टिप्पण्या