🌟काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब,रोजमजूर,कामगारांसह गरजवंत लोकांसाठी सुरू असलेली शिव भोजन थाळी बंद करण्याचा घाट राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घातला आहे लाडकी बहीण योजनेचे कारण पुढे करत शिव भोजन थाळी बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याने गोरगरीबांची शिव भोजन थाळी ताटातून गायब होणार का, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. गोरगरीब गरजू लोकांसाठी असलेली ही योजना बंद करू नये अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला शिव भोजन थाळी या योजनेमुळे अल्पशा दरात दहा रुपयांत चांगले अन्न मिळते. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिव भोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.......
0 टिप्पण्या