🌟मागील दोन वर्षांपासून गुरुद्वारा बोर्डात कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे🌟
नांदेड (दि.25 फेब्रुवारी 2025) :श्री हजुर साहेब नांदेड येथील सर्वोच्च धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डा मध्ये कार्यरत वरिष्ठ कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति देण्यात यावी. दोन वर्षें डेली वेजेस सेवा पूर्ण करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थाई सेवेत समाविष्ट करुन घ्यावे आणी रोजन्दार तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना डेली वेजेस सेवेत सहभागी करुन घेण्यात यावे. अशी मागणी शिवसेना पक्षाचे दक्षिण विभागातील सहसंपर्क प्रमुख सरदार गुरमीतसिंघ टमाना यांनी एका पत्राद्वारे गुरुद्वाराचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे.
सरदार गुरमीतसिंघ टमाना यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने कर्मचाऱ्यांना पदोन्नति देण्यात बाबत एका त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. पण पदोन्नति देण्यातकरिता नियमांचे पालन आवश्यक आहे. महाराष्ट्र सर्विस रूल्सचे आधार घेवून आणी वेतन श्रेणीच्या सिफाराशिचा अभ्यास करुनच निर्णय घेण्यात यावेत. मागील काळात ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्याँवर अन्याय झाले आहेत त्यांच्या बाबत सहानुभूतिपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पत्रात मागणी करण्यात आली आहे की ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दोन वर्षापेक्षा जास्त झाली आहे त्यांना सेवेत कायम करण्यात यावे. तसेच रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा डेली वेजस प्रणालित करण्यात यावी. वरील पत्राची प्रत शिवसेना नेते मा. आमदार हेमंत भाऊ पाटिल आणी मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठविण्यात आली आहे.
डेली वेजस कर्मचाऱ्यांचेही साकळे : गुरुद्वारा बोर्डात मागील दोन ते चार वर्षांपासून डेली वेजस म्हणून सेवा पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील एका निवेदना नुसार सेवेत स्थाई करण्याची विनंती मंगळवार रोजी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे. वरील नावाचे निवेदन गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक मार्फत पाठविण्यात आले आहे. निवेदनावर पुनीतसिंघ हजुरिया, जगजीतसिंघ असर्जनवाले, मनप्रीतसिंघ कोल्हापुरे, मनमोहनसिंघ लांगरी, मनप्रीतकौर शीतल आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या