🌟अकरा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरण ; लेफ्टनंट कर्नलला उच्च न्यायालयाचा दणका....!

 


🌟शिक्षा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार : मा.लेफ्टनंट कर्नलला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची झाली होती शिक्षा🌟

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ११ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सैन्य दलातील माजी लेफ्टनंट कर्नलला चांगलाच दणका दिला न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने या घटनेतील आरोपी लेफ्टनंट कर्नलला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा कोर्ट मार्शलचा आदेश रद्द करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

मागील चार वर्षांपूर्वी मार्च २०२१ मध्ये लष्कराच्या जनरल कोर्ट मार्शलने आरोपी लेफ्टनंट कर्नलला अल्पवयीन मुलीवर गंभीर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याखाली दोषी ठरवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली माजी लेफ्टनंट कर्नलला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेवर सशस्त्र दल न्यायाधिकरणाने शिक्कामोर्तब केले.

त्याविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. अपील याचिका दाखल केली होती आरोपीने आपला पीडित मुलीला स्पर्श करण्यामागे वाईट हेतू नव्हता, केवळ आजोबा आणि पित्यासारखे मुलांवर केल्या जाणाऱ्या प्रेमापोटी मुलीचे चुंबन घेतले, असा दावा केला. हा दावा कोर्टाने फेटाळला

💫उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण :-

पीडित मुलीला वाईट स्पर्शाची चांगली जाणीव होती. मुलीचे वडील खोलीतून बाहेर पडल्या नंतर आरोपी तिच्याशी कशा पद्धतीने वागला हे मुलीच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते. पीडित मुलीने आरोपीचा वाईट स्पर्श करण्याचा हेतू ओळखलेला आहे. तिने जनरल कोर्ट मार्शलसमोर जबाब दिला. त्यात तिने आरोपीचा दावा धुडकावून लावला होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या