🌟तांत्रिक कामगार युनियनची राज्याचे अप्पर मुख्य उर्जा सचिव कडे निवेदनाद्वारे मागणी🌟
नागपूर :- राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री व राज्याचे अप्पर मुख्य ऊर्जा सचिव यांच्या उपस्थितीमध्ये तांत्रिक कामगारांच्या प्रश्ना व मागण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने प्रलंबित असलेल्या प्रश्न व मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे राज्याचे अप्पर मुख्य ऊर्जा सचिव यांच्याकडे तांत्रिक कामगार युनियनने केली असल्याची माहिती केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या प्रश्न बाबत शासन, प्रशासन उदासीन आहे. तांत्रिक कामगारांना थकबाकी विज बिल वसुली करिता होणारी एकतर्फी दडपशाही त्वरित थांबवावी, महावितरण कंपनीतील चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक कामगारांना तृतीय श्रेणीमध्ये वर्ग करण्यात यावे. (तांत्रिक कामगारांमधून यंत्रचालक पदे 100% भरण्यात यावी), तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, राज्याचे मा. उर्जामंत्री व ऊर्जा सचिव समवेत पगारवाढ बैठक पार पडली व प्रलंबित असलेल्या पगारवाढ कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले. बैठकीमध्ये तारमार्ग कामगारांना ADHOC भत्ता हा रू. 500 वरून रु.1000 करण्यात आला. यामध्ये कोणताही दुजाभाव न करता सरसगट तारमार्ग कामगारांना (वर्ग 3 व वर्ग 4) देण्याचे ठरले. परंतु पगारवाढ करारामध्ये फक्त वर्ग 4 च्याच तांत्रिक कामगारांचा (तारमार्ग कामगार) समावेश करून वर्ग 3 च्या तारमार्ग कामगारांवर अन्याय केला आहे. या विषयांवर बैठकीमध्ये सुध्दा संघटनेने वारंवार विचारणा केली असता सदरहु ADHOC भत्ता हा सर्वांना देण्यात येणार असल्याचे कळविले. वेतन करारामध्ये वर्ग 3 च्या तारमार्ग कामगारांना ADHOC भत्ता मंजुर न केल्यामुळे तसेच ईतर कारणास्तव संघटनेने वेतन करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला व नाराजी व्यक्त केली.तरी मा. उर्जामंत्री व आपण दिलेल्या आश्वासनानुसार ADHOC भत्ता हा वर्ग 3 च्या कामगारांना सुध्दा अदा करण्यात यावा,शासन शुध्दीपत्रक क एसएसएन-1009/386/09/माशि-2 दि. 25/03/2013 नुसार कंपनीतील महीला विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक यांच्या प्रसुती रजा शासन निर्णय मान्य करण्यात यावा, शासन निर्णयाप्रमाणे विद्युत सहाय्यक / उपकेंद्र सहाय्यक व विजसेवक कंत्राटी तत्वाच्या पदावरील सेवा कालावधी उच्चवेतन श्रेणीकरीता ग्राहय धरण्यात यावे,
प्रलंबित असलेली वेतन अनामली आश्वासन दिल्याप्रमाणे तात्काल निकाली काढण्यात यावी, महावितरण कंपनीच्या STAFF NORMS (GAD/CGM/(T/E)MPR/33940 Dtd 04-11-2010) प्रमाणे राज्यातील प्रत्येक झोन मधील वितरण केंद्र (शाखा कार्यालय) व उपविभागीय कार्यालयाची विज ग्राहक संख्या चे सर्वेक्षण करून कार्यवाही करावी. तसेच एम. आय. डी. सी. साठी स्वतंत्र शाखा कार्यालयाची निर्मीती करण्यात यावी, तिन्ही कंपनीतील तांत्रिक कामगारांना Washing allowance (घुलाई भत्ता) मध्ये वाढ देण्यात यावी, प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी.तिन्ही विज कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना "वेतन करार 2023" प्रमाणे भत्यामध्ये 25 टक्के वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार महानिर्मिती कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना लागु असलेला फॅक्टरी अलाउन्स वेतन करारानुसार वाढीव देणे अपेक्षीत असतांना सुध्दा वाढ करण्यात आली नाही. तरी कराराप्रमाणे फॅक्टरी अलाउन्स मध्ये वाढ देण्यात यावी, पदवी पदविकाधारक तांत्रिक कामगारांना अनुभव लक्षात घेता प्राधान्याने अभियंता पदावर सामावून घेण्यात यावे, कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगारांच्या हमी द्यावी, कत्राटी कामगारांची आर्थिक व मानसिक होणारे पिळवणूक थांबवावी आदी प्रश्न प्रलंबित आहेत तात्काळ प्रलंबित प्रश्न मागण्याबाबत आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करून प्रश्न सोडवण्याची मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर. ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी दत्तु भोईर, किरण कऱ्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे, प्रदीप पाटील यांनी केली आहे....
0 टिप्पण्या