🌟त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा फरकडा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला🌟
पालम :- पालम तालुक्यातील वाडी ( बु ) येथील येथील रहिवासी बबनराव गायकवाड यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालम तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांची नियुक्ती मराठवाडा अध्यक्ष धाराजी भुसारे,परभणी जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे,पालम तालुका अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्या आदेशानुसार व मराठा समन्वय समितीचे पालम तालुका उपाध्यक्ष सिताराम गुरुजी पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा फरकडा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष प्रसाद पौळ,फरकडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजीराव पौळ, माजी चेअरमन रामभाऊ पौळ,मराठा समन्वय समिती तालुका उपाध्यक्ष सितारामजी पौळ,राम पौळ ,बालासाहेब पौळ,दुलाजी पौळ,परसराम पौळ,ज्ञानोबा पांचाळ,ज्ञानोबा पौळ,आदींची उपस्थिती होती त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचें सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......
0 टिप्पण्या