🌟या नामांतराच्या कार्यकारी आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षऱ्या केल्या🌟
वॉशिंग्टन : संपूर्ण जगभरात आतापर्यंत चर्चेत असलेल्या मेक्सिकोच्या खाडीचे नामांतर आता 'अमेरिकेची खाडी' असे झाले आहे.
या नामांतराच्या कार्यकारी आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 'एअर फोर्स वन' या विमानातून जात असतानाच त्यांनी हे काम पूर्ण केले. येत्या ३० दिवसांत नाव बदलाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे त्यांनी अंतर्गत खात्याला आदेश दिले. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर अमेरिकेच्या तटरक्षक दलाने तत्काळ 'अमेरिकेची खाडी' हे नामांतर केले आहे.....
0 टिप्पण्या