🌟80 तांत्रिक कामगारानी केला संघटनेत प्रवेश🌟
अमरावती :- अमरावती येथे दिनांक ८ फेब्रुवारी रोजी तांत्रिक कामगार युनियन (५०५९) मार्फत तांत्रिक कामगार संपर्क अभियानांतर्गत संपर्क व संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.संपर्क अभियानाची सुरुवात अमरावती परिमंडल कार्यालय येथील संघटनेच्या वार्ता फलक अनावरण सोहळ्याने बहुसंख्य तांत्रिक कामगारांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात तांत्रिक कामगार मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी संघटनेच्या केंद्रीय पदाधिकारी यांनी तांत्रिक कामगारांसोबत संवाद साधताना त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्यासाठी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करेल यांचे आश्वासन दिले व सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन केले. तसेच संघटनेची ध्येय धोरणे, वाटचाल तसेच संघटना स्थापनेमागची पार्श्वभूमी याबाबत माहिती दिली.
त्यामुळे प्रेरीत होऊन अरुण यावले साहेब, अविनाश पांडे साहेब व अनिल इसळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अमरावती परिमंडलातील जवळपास 80 सभासदांनी इतर संघटनेमधून तांत्रिक कामगार युनियन (५०५९) मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी केंद्रीय पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रवेश करणार्या सभासदांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमास सर्व केंद्रीय पदाधिकारी तसेच बहुसंख्य संख्येने सभासद उपस्थित होते.......
0 टिप्पण्या