🌟परभणी येथील हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्सातील देखरेखीसाठी देखरेख समिती स्थापन.....!


🌟देखरेख समितीत चोवीस जणांचा समावेश : वक्फ बोर्डाचा निर्णय🌟

परभणी (दि.०१ फेब्रुवारी २०२५) : परभणी येथील हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्स कालावधीत सर्व व्यवस्था तसेच भाविकांसाठीच्या सर्व सोयी-सुविधांची उपलब्धता व देखरेखी करीता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने एक तात्पुरती उर्स समिती स्थापन केली आहे.

           जिल्हा ग्राहक मंचाचे तसेच जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दीपक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीत कार्याध्यक्ष म्हणून रफियोद्दीन अशरफी, विधी सल्लागार म्हणून अ‍ॅड. अशोक सोनी, उपाध्यक्ष म्हणून भिमराव हत्तीअंबीरे, शेख शब्बीर शेख मोहम्मद, सचिव म्हणून अब्दुल समद फरीद शेख, सहसचिव म्हणून शेख निहाल नूर मोहम्मद, सदस्य म्हणून शकील मैनोद्दीन, अब्दुल खालेद अब्दुल रशीद, प्रभाकर लंगोटे, प्रविण देशमुख, फरीद खान रसूल खान, एन.डी. देशमुख, मोहम्मद गौस झैन, गुलाम मोहम्मद मिठ्ठू, अली शेख, श्रीमती नंदा राठोड, अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, अरुण मराठे, मोहम्मद फैमोद्दीन काझी, मुसा नागानी, सय्यद खैसर अली उर्फ बाबु भाई, सुभाष पांचाळ, मोहम्मद अलिमोद्दीन मैनोद्दीन काजी यांचा समावेश करण्यात आला आहे.

          या समितीने उर्स कालावधीत उर्सातील सर्व व्यवस्था, भाविकांसाठीच्या सोयी सुविधा यावर देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुशीर अहेमद शेख यांनी या नियुक्तीपत्रातून व्यक्त केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या