🌟राज्यातील गुटखा बंदी नावाला ? गुटखा सहज मिळती संपूर्ण ताडकळससह आसपासच्या गावांना🌟
पुर्णा :- राज्यात संपूर्णतः प्रतिबंधित असलेल्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्रीसह तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या निर्देशानंतर काही काळ पुर्णा तालुक्यासह ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत देखील ताडकळस पोलिस पोलिस प्रशासनाने राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यासह तंबाखू मिश्रित खर्रा गुटखा विक्रीवर बंदी केली होती परंतु काही कालावधीनंतर पुन्हा 'नव्या दमाने नव्या जोमाने' राजरोसपणे ताडकळससह अनेक गावांत अगदी सहजपणे प्रत्येक पान टपऱ्यांवर किराणा दुकानावर सहज गुटखा तंबाखूजन्य खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्य सरकारने तंबाखू मिश्रित गुटखा बंदी केली असता पान टपरी दुकानदार पोलीस यांच्या आकस बुद्धिने सहजरीत्या उपलब्ध गुटखा उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे.युवा वर्ग महिला वर्ग या गुटक्याच्या आहारी जाऊन आरोग्य व मुक वास येत असल्याने अनेक अनेक जन चिंताग्रस्त आहेत.तरीपण सवयी मुळे गुटक्याचा माल जहज उपलब्ध होत असल्यामुळे त्यामुळे दिवसेंदिवस गुटख्याकडे युवा वर्ग वळलेला दिसत आहे.अनेक वेळा पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून गुटखा विक्री भादरावर कारवाई केल्याचे दिसत आहे संबंधित गुटखाबंदी दिलेला शासनाचा निर्णय कधी योग्य ठरेल व त्यावर कधी कारवाई होईल अशी मागणी ताडकळस परिसरातील ग्रामस्थातुन होत आहे......
✍️सचिन सोनकांबळे (ताडकळस)
0 टिप्पण्या