🌟इस्त्राईल-पॅलेस्टाईन युक्रेनमधील युध्दग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने आधार द्यावा...!


🌟राज्यसभा खासदार श्रीमती फौजिया खान यांनी संसदेच्या अधिवेशनात मागणी🌟

परभणी :- केंद्र सरकारने इस्त्राईल-पॅलेस्टाईन आणि युक्रेनमधील संघर्षामुळे अभूतपूर्व अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही उपाययोजना करीत त्यांना आधार द्यावा अशी मागणी खासदार श्रीमती फौजिया खान यांनी राज्यसभेत केली.

 संसदीय अधिवेशनात श्रीमती खान यांनी शुक्रवारी परराष्ट्रीय धोरणांवर प्रश्‍ना दरम्यान एक पूरक प्रश्‍न विचारुन इस्त्राईल-पॅलेस्टाईन आणि युक्रेनमधील संघर्षामुळे हजारो भारतीय विद्यार्थी अभूतपूर्व अडचणीत आले आहेत. विशेषतः त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे भविष्यातील संधीवरसुध्दा परिणाम झाला आहे. या विद्यार्थ्यांना आधार देण्याकरीता सरकारने उपाययोजना अवलंबविण्याची नितांत गरज आहे. जसे की कॅम्पस लॉकडाऊन, अभ्यासातील व्यत्यय, ऑनलाईन शिक्षणातील अडीअडचणी, अर्धवट शिक्षण, पुढील परिक्षा वगैरेंबद्दल तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी धोरणात्मक बदलही गरजेचे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने भारतीय विद्यार्थ्यांचे हक्क आणि शिक्षण सुरळीत रहावे या दृष्टीने अधिक जबाबदारीने काम करावे, संकटात अडकलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक मदत आणि आवश्यकतेनुसार मायदेशी परत आणण्याकरीता काही योजना अवलंबवाव्यात, अशी मागणी श्रीमती खान यांनी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या