🌟अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली🌟
नवी दिल्ली : भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरून दि.१२ व १३ फेब्रुवारी २०२५ ला दोन दिवसांच्या अधिकृत अमेरिकी दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा हा पहिला दौरा असेल. नवीन सरकार आल्यानंतर तीन आठवड्यांत पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेने दौऱ्यासाठी आमंत्रित केले. हे दोन्ही देशांचे संबंध मजबूत असल्याचे प्रतिबिंबित करते....
0 टिप्पण्या