🌟स्वतःच्या वाढदिवशी सुरू केला बस थांबा : ॲड.किशोर देशमुख यांचे पंचक्रोशी नागरिका कडून आभार व्यक्त....!


🌟या ठिकाणी बसचा थांबा नसल्यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय होत होती🌟


नांदेड (दि.०७ फेब्रुवारी २०२५) :- नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर संस्थान असून दर गुरुवारी  पंचक्रोशीतील हजारो भक्त स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी थांबतात परंतु सदरील मंदिर हायवे रोडवर असताना देखील या ठिकाणी बसचा थांबा नसल्यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय होत होती तसेच प्रवाशांनी बसला हात दाखवला तरी बसेस थांबत नव्हत्या  त्यामुळे गावाला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना भर उन्हात  ताटकळत बसावे लागायचे.

     ही प्रचंड गैर सोय पाहून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शहापूर येथील  स्वामी समर्थ मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी गेलेले भाजपाचे नांदेड उत्तर चे जिल्हाध्यक्ष  एडवोकेट किशोर देशमुख यांनी नागरिकांची तक्रार लक्षात घेऊन लगेच बस थांबा करण्याबाबत निर्णय घेऊन बस थांब्याचा फलक बसवला. व महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष राव साबळे यांनी याप्रसंगी एडवोकेट किशोर देशमुख यांचे हस्ते समर्थांची महाआरती करून त्यांचे औक्षण करून शाल  श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले या बस थांब्यामुळे पंचक्रोशीतील चाबरा, चनापोर, आंबेगाव, तामसा, येळेगाव, बारसगाव, बोरगडवाडी, शनि कोंढा आदी व इतर गावातील  नागरिकांनी त्यांचे आभार मानले.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या