🌟सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित आरोग तपासणी शिबिर संपन्न...!


🌟शिवसेनेच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ४६० नागरिकांची करण्यात आली मोफत तपासणी🌟


✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : शिवसेनेच्या वतीने ज्यातीनगर , एस बी एच कॉलनी, क्रांतीचौक , चौसर, श्रेय नगर, म्हाडा कॉलनी, फुलेनगर, जय नगर, भीमपुरा या भागातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल ४६० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. युगंधर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हर्षदा संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वरूप हॉल ज्यातीनगर याठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा संतोष बोर्डे, संयोजक शिवसेना प्रसिध्दीप्रमुख अभिजीत पगारे यांच्यावतीने करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, सह संपर्कप्रमुख माजी महापौर विकास जैन,माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभा ताई जगताप , महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिल्पा ताई वाडकर , शहर संघटक संतोष मरमठ , डॉक्टर सेल चे अध्यक्ष डॉ. उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


विशेष म्हणजे या शिबिरात तब्बल ४१२ नागरिकांची नेत्र तपासणी , ४८ जणांची इ. सी.जी , रक्तदाब तपासणी , रँडम ब्लड शुगर टेस्ट , वजन मापन , उंची मापन , तपासणी करण्यात आली या सर्व तपासण्या मोफत केल्या असून  तज्ञ डॉक्टरांनी यावर मोफत सल्ला दिला आहे, तसेच नेत्र तपासणी दरम्यान १११  रुग्णाना मोतीबिंदू असल्याचे निदान आढळले असून या रुग्णाची टप्याटप्याने मोफत मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया आयोजकांच्या वतीने केली जाणार आहे. परिसरातील नागरिकांचा या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरासाठी सिग्मा हॉस्पिटल ची टीम, तसेच लायन्स हॉस्पिटल चिकलठाणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी  उपजिल्हाप्रमुख रमेश बहुले ,रखमाजी जाधव, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा संघटक अजहर भाई, उपशहरप्रमुख राजू राजपूत , सुधीर चौधरी , अनिल मुळे ,अनिल बिरारे, विजय पैठणे , गणेश जाधव, रणजीत ढेपे , संजय भुजबळ, शिवा हिवाळे ,महिला आघाडीच्या सुनीला क्षत्रिय , राखी सुरडकर, रेणुका गायकवाड, नीलम वडोदे, लक्ष्मण बताडे , साईनाथ वाहुल,दीपक पवार, संतोष खोडकर, नितीन साबळे, नंदकुमार उडाण, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा.सचिन बोर्डे, डॉ. अशोक जोंधळे, रणजित साळुंखे,महेश सुर्यवंशी, सचिन घाटे, सूरज सुर्यवंशी, सौरभ घाटे, योगेश आमराव, सागर साळवे, दलजित लुगानिया, शंतनु जोशी, आनंद पिलखाने , प्रितम वाघमारे, कपिल गायकवाड, रवी जगताप, रणजीत साळुंके, सोनू पाटील.

महिला आघाडीच्या वंदना सुर्यवंशी,उमा लोळगे,रिया चावरिया, सविता घाटे, मीना घाटे, रंजना मोरे आदींनी परिश्रम घेतले.......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या