🌟छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील 'आस' व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र ठरतंय व्यसनग्रस्तासाठी आशेचा किरण....!


🌟येत्या ०५ मार्च २०२५ पासून दहा दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचा आयोजन केंद्राच्या वतीने करण्यात आले🌟

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जायकवाडी उत्तर या ठिकाणी सुप्रसिद्ध समाजसेवक देवेश इनामदार यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनग्रस्त व्यक्तीच्या जीवनामध्ये  अमुलाग्र परिवर्तन घडवण्याचं काम व्यापक स्वरूपामध्ये होताना दिसत आहे. समाजामध्ये कमालीची व्यसनाधीनता आणि सातत्याने वाढत असलेलं प्रमाण चिंतेचा विषय बनत चाललेला आहे व्यसनाधीन व्यक्ती कुटुंबासाठी समाजासाठी गहण समस्या बनलेली आहे. 

महाराष्ट्र मध्ये व देशामध्ये सुसज्ज व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फीस घेऊन रुग्णाला ऍडमिट केले जाते. त्यापैकी काही व्यसनमुक्ती केंद्र अतिशय माफक दरामध्ये  व्यसनग्रस्त व्यक्तीस ऍडमिट करून सेवाभावी वृत्तीने त्यांच्यावर उपचार केले जातात अशाच प्रकारचं आस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र पैठण येथील जायकवाडी उत्तर नाथसागराच्या तीरावर निसर्ग रम्य ठिकाणी वसलेलं हे केंद्र सेवाभावी वृत्तीने चालवल्या जाते या केंद्राला सुरुवात होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. शंभराच्या वर रुग्ण या ठिकाणी दाखल झाली.आणि कित्येक व्यसनमुक्त व मानसिक आजारातून मुक्त झाले. आज व्यसनमुक्ती केंद्राचे अर्धयु संस्थापक देवेश इनामदार यांनी हे पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात पाठीमागची भूमिका जाणून घेतल्यानंतर त्यांच्या प्रति असलेली कृतघ्नता आदर द्विगुणीत झाला. देवेश जी यांचे दोन बंधू व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामधून बाहेर येण्यासाठी त्यांना व्यसनमुक्ती केंद्र मध्ये ठेवण्यात आले. या व्यसनमुक्ती केंद्र मध्ये व्यसनग्रस्तांना अतिशय वाईट वागणूक दिली जात होती. वेळोवेळी त्यांना मारहाण हे करण्यात येत होती.

मोठ्या प्रमाणावर फीस करण्यात येत होती. गोळ्या औषधाचे डोस देऊन त्यांना तात्पुरते बाहेर आणले जात होते. परंतु मानसिक परिवर्तन करण्यामध्ये ही केंद्रे कुठेतरी कमी पडताना त्यांना दिसत होती. त्यांचे एक व्यसनग्रस्त बंधू अकाली मरण पावले. व्यसनग्रस्त व्यक्ती हा ही एक माणूस आहे त्याला मन आहे भावना आहे व्यसनाधीनतेकडे तो कसा वळला त्याचं अंतर्मन जाणून घेण्याचा कोणत्याही प्रयत्न त्या ठिकाणी होत नव्हता. बऱ्याचशा उणिवा त्या ठिकाणी त्यांना जाणवल्या. आपल्या कुटुंबाच्या वाट्याला जे दुःख वेदना आल्या समाजामधील इतरांच्या त्या वाट्याला येऊ नये यासाठी देवेश इनामदार व त्यांच्या पूज्य माता यांनी संकल्प केला आपण अशा प्रकारचे व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करू ज्या ठिकाणी व्यसनग्रस्तांना सन्मानाची वागणूक मिळेल त्याच्या शारीरिक आरोग्याबरोबर त्याचं मानसिक पुनर्वसन होईल. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा आशावादी होईल भावी जीवनामध्ये त्याला चांगल्या सवयी लागतील सर्व प्रकारच्या विकारापासून व्यसनापासून तो कायमस्वरूपी दूर राहील त्याच्या आवडीच्या उद्योग धंद्याकडे तो वळेल 

हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून पैठण येथील जायकवाडी उत्तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठे जलाशय नाथसागराच्या निसर्ग रम्य तीरावर आस व्यसनमुक्ती केंद्र त्यांनी सुरू केले. आपले दुसरे बंधू यांना व्यसनमुक्त करण्यामध्ये देवेश जी यशस्वी झाले. आता ते माध्यम क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करत आहे.या ठिकाणचे कर्मचारी समुपदेशक यांनी या कार्याला काया वाच्या मनाने समर्पित भावनेने वाहून घेतले आहे.येथील समुपदेशक उच्च विद्या विभूषित असून एम. ए.सायकॉलॉजी व मानसशास्त्रासंबंधी उच्च शिक्षण घेतले आहे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग मनोरुग्णासाठी व्यसनग्रस्तांसाठी वरदान ठरत आहे त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान व समृद्धीची रम्य पहाट पहावयास मिळते आहे.मोबाईलच्या वापरावर येथे पूर्ण बंदी आहे.अगदी भल्या पहाटे योगा प्राणायाम ध्यान साधना शारीरिक व्यायाम कुशल प्रशिक्षकाकडून दररोज करून घेतल्या जातो. 

सकस आहार दूध योग्य औषधोपचार यामुळे येथे दाखल झालेले व्यसनग्रस्त व मनोरुग्णाचे आरोग्य चांगल्या प्रकारचे सुधारले जाते असं म्हटलं जातं निरोगी शरीरामध्ये निरोगी मन असतं दररोज या ठिकाणी समुपदेशन प्रेरणादायी व्याख्याने मनोरंजन आणि खेळ यामुळे मानसिक आरोग्य निरोगी व निरामय राखण्यामध्ये मदत होत असते कुटुंबामध्ये निर्माण झालेला दुरावा स्वभावामध्ये असलेली दोष राग लोभ तिरस्कार असूया हे निघून जातात.यामुळे कौटुंबिक संवादामध्ये सुधारणा प्रेम आणि जिव्हाळा वाढीस लागण्यास मदत होते समुपदेशनामुळे या ठिकाणी दाखल झालेले रुग्ण जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतात दिवसभरामध्ये नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबविल्यामुळे त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जेचा संचार होतो नियमित आरोग्य तपासनि औषधोपचार रक्ताची चाचणी यामुळे आरोग्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होत असते या कार्यातून येथे काम करणारे कर्मचारी यांना कमालीचे मानसिक व आत्मिक समाधान मिळत असते.

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे या वचनानुसार आज सेवा केंद्राची वाटचाल सुरू आहे . देवेश इनामदार एक प्रेरणादायी स्फूर्तीदायक व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. संभाजीनगर आणि पैठण या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेल्या मानसी पतसंस्था आहेत. अगोदरचा त्यांचा इतिहास असा आहे पूर्वी ते एका पतसंस्थेमध्ये सहाशे रुपये पगारावर काम करत होते. परंतु त्यांनी स्थापन केलेल्या व ते अध्यक्ष असलेल्या पतसंस्थेचे भाग भांडवल 50 कोटी रुपयाचे आहे. अतिशय पारदर्शक ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य व सामाजिक बांधिलकी जपणारी ही पतसंस्था आहे. अनेक गरजू आर्थिक अडचणी मध्ये सापडलेल्या जनतेला त्यांच्या माध्यमातून मदत मिळत असते. आपल्या व्यस्त वेळापत्रक मधून ते बराचसा वेळ आस व्यसनमुक्ती केंद्राला देत असतात.

येत्या ०५ मार्च २०२५ पासून दहा दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचा आयोजन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे आस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रास हार्दिक शुभेच्छा 

✍️श्रीकांत हिवाळे सर 

मा. तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या