🏆साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनच्या वतीने देण्यात येतो हा मानाचा पुरस्कार🏆
परभणी : महाराष्ट्र रत्न पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन संस्थापक उपाध्यक्ष सचिन सोनकांबळे यांनी केले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन च्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 हा राज्यातील सामाजिक शैक्षणिक शिक्षक, आदर्श ग्रामपंचायत,सांस्कृतिक,कृषी,सहकार उद्योग,वैद्यकीय,प्रशासकीय,पत्रकारिता,वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया,युवक महिला,कला साहित्य क्रीडा पर्यावरण ग्रामविकास अधिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्य गौरव सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार आयोजित केला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे असून इच्छुकांनी आपले नाव नोंदणी आजच करून घ्या पुरस्कार वितरण नासाठी नाव नोंदणी दिनांक १५ मार्च 2025 रोजी पर्यंत करण्यात येणार असून सदरील कार्यक्रम हा २३ मार्च 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त महाराष्ट्र रत्न पुरस्कारसाठी नाव नोंदणी करावी यासाठी आपण केलेल्या कार्याची पुरावे व कागदपत्रे फोटोसह ८००७३७२२१४,७७७३९९५३६५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे असेही आव्हान साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन संस्थापक उपाध्यक्ष सचिन सोनकांबळे यांनी केले आहे....
0 टिप्पण्या