🌟हिवरखेडा येथील लहान मुलांनी शिवाजी महाराज याच्या प्रतिमा सायकल वर लाऊन गावात सायकल रैली काढली🌟
हिंगोली :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रिवार जयजयकार करत सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथेभव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्सहात शिवजयंती साजरी करण्यात आली या वेळी शिवाजी महाराज व महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व तसेच हिवरखेडा येथील लहान मुलांनी शिवाजी महाराज याच्या प्रतिमा सायकल वर लाऊन गावात सायकल रैली काढली व दुपारी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माहिलाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या वेळी उपस्थितीत हिवरखेडा येथील शिवाजी गायकवाड शिवशंकर निरगुडे आकाश निरगूडे दत्ता देसाई शरद निरगुडे आश्रुजी गायकवाड अनिल गायकवाड रामेश्वर देसाई जीवन हराळ स्वप्निल हराळ गजू शिरसागर ज्ञानेश्वर माळेकर नागेश गायकवाड माधव गायकवाड उद्धव गायकवाड गजानन गायकवाड अंगणवाडी मॅडम रंजनाताई इंगळे आशा वर्कर रेणुकाताई गायकवाड यांच्या सह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती....
✍️शिवशंकर निरगुडे :- हिंगोली
0 टिप्पण्या