🌟पुर्णेत दि.१६ फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन.....!


🌟माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरात निघणार त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक🌟 

पुर्णा (दि.१४ फेब्रुवारी २०२५) - पुर्णा शहरात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिणच्या वतीने रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमिताने दि.१६ फेब्रवारी रोजी सकाळी ११ः३० वाजता डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन डॉ.आंबेडकर नगर येथुन माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक वाघवृंद लेझीम पथका सह सिद्धार्थ नगर रेल्वे कॉलनी विजय नगर भिमनगर खुरेशी मोहल्ला किंग कॉर्नर शिवाजी पुतळा बसवेश्वर चौक मार्गे डॉ आंबेडकर चौक येथे दुपारी १:३० वाजता धम्मसभेत रूपांतर होईल.

या धम्मसभेच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या दक्षिण परभणी जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे राहणार आहेत यावेळी प्रमुख धम्मदेशना भदंत डॉ उपगुप्त महाथेरो बुद्ध विहार पूर्णा भदंत पी धम्मानंद सदस्य भाबौ महा भिक्खु संघ परभणी भन्ते पंयावंश यांची होईल या  मुख वक्ते म्हणून नांदेड येथील भारतीय बौद्ध महासभेच्या दक्षिण विभाग नांदेडच्या सरचिटणीस ॲड चित्रलेखा कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून बाबा साहेब धबाले राज्य सचिव व भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य परभणी उत्तरचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे ' एमएम भरणे केंद्रीय शिक्षक भाबौमहा परभणी आनंदा भेरते मराठवाडा प्रमुख समता सैनिकदा महाराष्ट्र राज्य व्हीव्ही वाघमारे माजी जिल्हाध्यक्ष भाबौ महासभा परभणी विश्वनाथ झोडपे माजी जिल्हाध्यक्ष भाबो महा परभणी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत या निमिताने सकाळी १० वा डॉ आंबेडकर चौक येथे शाहीर प्रकाश जोंधळे आणि संचाचा प्रबोधन गीतांचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा या जयंती सोहळ्यास जास्तीत नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा दक्षिण परभणी जिल्हा शाखा समता सैनिक दल पूर्णा शहरातील महिला मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या