🌟आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छा तर बोलून दाखवत नाही ना ?

🌟जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा रिपाइं नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्यक्त केलेले सडेतोड विचार🌟 

नवल आहे मुख्यमंत्री याबाबत २५ दिवसात कोणतेही भाष्य करीत नाहीत ? मला नवल या गोष्टीचे सुद्धा वाटते आंबेडकर चळवळीतील नेत्यांच्याही संवेदना बोथट झाल्या की काय ? एकाही नेत्याने मोर्चेकऱ्यांना भेट दिली नाही, की त्यांच्या वेदनांची विचारपूस केली नाही भाजपा वाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आणि त्यांच्या तुकड्यावर जगणाऱ्यानिही या प्रश्नावर संघी भाजपा नेत्यांशी चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू नयेत ही बाब अशोभनीय वाटते नुसत्या वल्गना सुर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे कशी होईल ? आरोपींवर अजून सदोष मनुष्य वधाचा गुन्हाच दाखल झाला नाही.

     आमदार सुरेश धस यांनी केलेली या प्रकरणी केलेली शिष्टाई ही मुख्यमंत्री यांचीच इच्छा आहे असे वाटते. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. हा नैसर्गिक आणि संविधानिक न्याय असताना धस त्यांना माफी करण्याची कुणाच्या सांगण्यावरून विनंती करीत आहेत ? हे त्यांनी स्पष्ट करायला हवे.पोलिसांना माफी करून त्यांना पुन्हा आंदोलनातील आंबेडकर चळवळीतील लोकांना मारण्यास त्यांचे मुडदे पाडण्यासाठी प्रवृत्त करायचे आहे का ? की राज्यात पोलिसांचे सामान्य लोकांवर अन्याय करण्यासाठी मनोबल वाढवायचे आहे ? नेमके त्यांना कुणाला खुश करायचे आहे.

    परभणी प्रकरणी आमदार धस जी मुक्ताफळे उधळीत आहेत तशीच भूमिका ते बीड प्रकरणीही बोलतील का ? बीड साठी वेगळी भूमिका आणि परभणी साठी वेगळी भूमिका ? हे बरे नव्हे सुज्ञ लोकांनी याचा विचार करावा असे सडेतोड विचार जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा रिपाइं नेते प्रकाश दादा कांबळे यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या