🌟प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे जनसामान्यांचे 'हर घर नल हर घर जलचे' स्वप्न अधुरेच🌟
परभणी : परभणी जिल्ह्यात जलजिवण मिशन योजनेचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र दिसत असून शासनाने या जलजिवण मिशन योजनांतर्गत ग्रामीण भागांतील पाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊन देखील संबंधित कार्यालयांसह स्थानिक ग्रामपंचायतींनी या योजनेची अक्षरशः वाट लावल्याचे पाहावयास मिळत असून प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे जनसामान्यांचे 'हर घर नल हर घर जलचे' स्वप्न अधुरेच असल्याचे पाहावयास मिळत आहे या संदर्भात जय किसान आंदोलन स्वराज इंडियाचे अध्यक्ष गोविंद गिरी यांनी प्रधान सचिवांकडे निवेदन देऊन त्यांचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे ‘हर नल हर घर जलजीवन मिशन योजनांतर्गत जिल्ह्यातील असंख्य गावांतील अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लावावीत अशी मागणी देखील गोविंद गिरी यांनी प्रधान सचिवांकडे केली केली.
राज्यासह जिल्ह्यात सन २०२१/२२ पासून या जल जीवन मिशन योजनांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रारंभ झाला. परंतु या योजनांतर्गत अद्यापही केवळ २५ ते ३० टक्केच कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे पुढे सरकली नाहीत, आज ना उद्या कामे होतील, या अपेक्षेने ग्रामस्थ मौन बाळगून होते. परंतु, आता कामे पूर्ण होत नसल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत, असे गिरी यांनी या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पुढील समस्या आढळून आल्या आहेत, असे स्पष्ट करतेवेळी कंत्राटदाराच्या अनागोंदी कारभारामुळे योजना अपूर्ण आहेत,काही ठिकाणी कंत्राटदार त्यांच्या फायद्याची कामे पूर्ण करून उर्वरित कामे तसेच ठेवत आहेत, ज्यामध्ये कमी नफा आहे, अशा भागातील कामे दुर्लक्षित केली जात आहेत. त्यामुळे अनेक गावे जल जीवन मिशनच्या फायद्यापासून वंचित राहतील, अशी भिती निर्माण झाली आहे. अर्धवट कामे व निधीवरील कपातएकूण कामाच्या दहा टक्के निधी जिल्हा परिषद वजा करून घेते. त्यामुळे कंत्राटदाराला आर्थिक भार येतो आणि ते अर्धवट कामे सोडून देतात. याचा थेट परिणाम ग्रामीण जनतेला होतो आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. २०२६/२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जल जीवन मिशन योजना २०२८ पर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यमान अपूर्ण कामे लांबत जाऊ नयेत, यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. ज्या गावांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही, तेथील नळपाणी योजना त्वरित कार्यान्वित करावी. कॉन्ट्रॅक्टरच्या अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने ठोस पावले उचलून जनतेस पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवावी, आदी मागण्याही गिरी यांनी या निवेदनाद्वारे केल्या आहेत......
0 टिप्पण्या