🌟दिल्ली विधानसभा विरोधी पक्षनेत्या म्हणून अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब🌟
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड करण्यात आली असून माजी मुख्यमंत्री आतिशी या दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असतील.
आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या काल रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली अरविंद केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त पक्षाचे सर्व २२ आमदार या बैठकीला उपस्थित होते दिल्ली विधानसभेचे अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ते २७ फेब्रुवारीपर्यंत चालेल. २६ तारखेला शिवरात्रीमुळे सुट्टी असेल. पहिल्या दिवशी नवीन आमदार शपथ घेतील. हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली त्यांना शपथ देतील.
0 टिप्पण्या