🌟नागरी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :- विद्याधर महाले पाटील


🌟बाबासाहेबांमुळे मी सचिव व आमदार होऊ शकलो सिद्धार्थ खरात🌟

✍️ मोहन चौकेकर                                    

 चिखली :- सम्राट अशोक-फुले-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवषीं प्रमाणे या ही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा व माता रमाई आंबेडकर यांचा संयुक्त जयंती समारोह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्य काही कर्तुत्ववान मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले यात सत्त्कारमूर्तीसमाज कल्याण मंत्री संजय सिरसाठ, विद्याधर महाले पाटील खाजगी सचिव, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,सिध्दार्थ खरात आमदार, मेहकर विधानसभा, सौं श्वेताताई महाले पाटील,विद्यमान आमदार, चिखली विधानसभा, हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. सतीष गवई,अध्यक्ष, सम्राट अशोक- फुले- आंबेडकर जयंती उत्सव समिती, चिखली हे होते.

यावेळी प्रास्ताविकात डॉ प्रा सुभाष राऊत यांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय चिखली येथील डायलेसिस सुविधा, फुले आंबेडकर वाटीकेतील डीपी, भीमक्रांती नगर चे समाज मंदिर, भीम ज्योती नगर, बार्टी चा निधी, रखडलेल्या शिष्यवृत्ती, ग्रामीण भागातील समाज मंदिर, सभा मंडप, बुद्ध विहार व इतर नागरी समस्या मान्यवरांच्या समोर विषद केल्या. त्यामुळे सत्काराला उत्तर देतांना विद्याधर महाले यांनी सर्व नागरी समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन मध्ये चिखली च्या आमदार सौं श्वेता ताई महाले सक्षम असून प्रा राऊत यांनी मांडलेल्या सर्व नागरी समस्या येत्या दोन महिन्यात सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

तसेच बाबासाहेबानी दिलेल्या हक्क अधिकारामुळे मी शिक्षण घेऊन मंत्रालयात नोकरी केली व आज त्यांच्याच मुळे मेहकर चा आमदार होऊ शकलो असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले. तसेच आमच्या समाज बांधवांच्या नागरी समस्याना प्राधान्य क्रम देऊन तात्काळ सोडविण्यासाठी अग्रही विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड सतीश गवई यांनी व्यक्त केले.यावेळी ऋणानुबंध ऑर्केस्टा चे गायक एस एस मोरे यांनी बुद्ध भीम गिते गाऊन समाज प्रबोधन करून सर्व उपस्थित समाज बांधवांचे मन जिंकले. कार्यक्रमाला तालुक्यातील समाजबंधव मोठयासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचालन विलास घोरपडे तर आभार प्रदर्शन एस एस गवई यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव विनोद पवार,दत्ताराव चव्हाण, दयानंद निकाळजे, विकी शिनगारे, विलास वाघ, प्रशांत डोंगरदिवे, किशोर बोर्डे, विणकर बाबूजी, ढाकरके महाराज, सुरेश अवसरमोल, ऍड दयानंद जाधव, हर्षवर्धन पवार, प्रकाश साळवे, अरविंद गजभिये, डॉ गजानन जाधव, विनोद कळस्कर, रवींद्र वाकोडे, ऍड राजीव जाधव, बाळू भिसे, डॉ अशोक गवई, आनंदराव हिवाळे, विशाल खरात, प्रा पी. एस. खिल्लारे, सदानंद मोरे, सुनंदाताई कासारे, सुनंदा ताई शिनगारे, भाई विजय गवई, दौलत बोर्डे, सुभाष पाखरे, बिपीन इंगळे, संतोष सुरडकर, यांनी खूप परिश्रम घेतले....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या