🌟युवकांनी विधायक कार्य करुन समाजस्वास्थ बिघडणार नाही याची विशेष दक्षता घेतली पाहिजे - प्रा.डॉ.रमेश शिंदे


🌟पुर्णा तालुक्यातील आहेरवाडीत आयोजित बहि:शाल व्याख्यानमालेत ते बोलत होते🌟

पुर्णा (दि.०५ फेब्रुवारी २०२५) :- आपला देश जगात तरुणांचा देश  म्हणून ओळखला जातो तेव्हा युवकांनी विधायक कार्य करुन समाजस्वास्थ बिघडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे व राष्ट्र निर्माण करुन देशाला पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ.रमेश शिंदे यानी बहि:शाल व्याख्यानमालेत केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र ग्रामीण व युवक मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित आज तालुक्यातील आहेरवाडी आयोजित बहि:शाल व्याख्यानमालेत ते बोलत होते. 

कार्यक्रमाचा अध्यक्षीय स्थानी शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव हे होते तर प्रमुख उपस्थितीत पञकार  डाॅ.विजयकुमार कुलदिपके , बबन पारवे  गंगाधर सोनटक्के हे होते प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.प्रदिप कदम यांनी करुन दिला 'राष्ट्र उभारणीत युवकाचें योगदान' याविषयावर बोलताना डाॅ.शिंदे म्हणाले की युवकांवर देशाची प्रतिमा  अवलंबून असते तेव्हा तरुणांनी व्यसनाच्या नांदी न लागता विविध विधायक कार्य करीत राहवे तरच देशाची प्रगती होईल. 

कार्यक्रमाचे सुञसंचालन  मयुरी खंदारे व साक्षी मोरे या दोघीनीं केले  शेवटी आभारप्रदर्शन सुनिल पारवे यानीं मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.उत्तम मोरे प्रा.सतीश भालेराव,बबन पारवे, संदिप विश्वासराव  सत्यम खंडागळे  प्रकाश महाजन,मारोती मुडें,सचिन लिझडे,करण राऊत यानीं विशेष साह्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या