🌟परळीत बौद्ध धर्मीय राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन - बालासाहेब जगतकर


🌟जास्तीत जास्तमुला/मुलींच्या आई-वडिलांनी नाव नोंदणी 9689847111 व 9112311777 या व्हाट्सॲपवर करावी🌟  

परळी :- परळीत बौद्ध धर्मीय राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय व नाव नोंदणी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक मानपत्राचे संपादक वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.                                               

याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने समाजातील अनेक गोरगरिबांचे लग्न लावून देणे म्हणजे सामूहिक विवाह सोहळा घेणे. लग्न जुळवणे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे कार्य गौरव पुरस्कार देणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे व त्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी सह अनेक सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून व समाजातील मुला-मुलींचे लग्न होण्यास अडचण दूर व्हावी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना आपल्या मुली मुलाविषयी कुठे वधू वर मिळतात का याची संपूर्ण माहिती या मेळाव्यातून व या नाव नोंदणीतून होणार असून यासाठी एक बौद्ध वधू वर सूचक परिचय विशेषांक प्रकाशित ही केला जाणार आहे तरी जास्तीत जास्त मुलांच्या आई-वडिलांनी या बौद्ध धर्मीय राज्यस्तरीय वधू वर पालक मेळाव्यास नाव नोंदणी करावी व दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी परळी शहरातील नटराज रंग मंदिर परळी वैजनाथ येथे सकाळी दहा वाजता या कार्यक्रमास सुरुवात होऊन यात नाव नोंदणी केल्या जाईल त्यासाठी जास्तीत जास्त मुलांच्या आई-वडिलांनी नाव नोंदणी 96 89 84 71 11 व 91 12 31 17 77 या व्हाट्सअप वर करावी असेही आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक मानपत्राचे संपादक वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या