🌟विवाहितेस माहेरहून घर बांधकाम करण्यासाठी दोन लाख घेऊन ये म्हणुन घराबाहेर हाकलून दिले.....!

 


🌟पुर्णा तालुक्यातील सातेफळ (वाघ) येथील घटना : चुडावा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल🌟

पुर्णा (दि.२५ फेब्रुवारी २०२५) :- पुर्णा तालूक्यातील सातेफळ (वाघ) येथील एका विवाहितेस घर बांधणीसाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. त्याचबरोबर जिवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी पती,सासू-सासरे,आजी सासू यांच्या विरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सातेफळ (वाघ) येथील विवाहितेस माहेरहून घर बांधण्यासाठी २ लाख रुपये घेऊन ये, म्हणून सासरच्या मंडळींनी मागील अनेक महिन्यांपासून तगादा लावला होता. तसेच माहेरहून पैसे नाही आणल्यास जीवे मारुनटाकु व हे कोणास कळणार देखील नाही अशी धमकी देत  अनेक दिवसांपासून उपाशीपोटी ठेवले जात होते. हा प्रकार पीडित विवाहितेने आपल्या माहेरी रेगाव (ता. पूर्णा) येथील आई वडिलांना सांगितला. अखेर या प्रकरणी चुडाव पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली.

या प्रकरणी विवाहितेचा पती रामेश्वर शिवाजी जोगदंड, सासरा शिवाजी बाबाराव जोगदंड, सासू गोदाबाई शिवाजी जोगदंड, आजी सासू बाबनराव जोगदंड यांच्याविरूद्ध चुडावा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या