🌟हुजुरी पाठी संघटनेची निवेदनाद्वारे सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांकडे मागणी🌟
नांदेड :- नांदेड येथील सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डांतर्गत आदी श्री गुरु ग्रंथ साहिब जी आणि दशम गुरु ग्रंथ साहिब जी टकसालच्या विविध संस्थांमध्ये संथ्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा आदरणीय पंचप्यारे साहिबान किंवा हुजुरी विद्वानांकडून गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने तात्काळ घ्यावी अशी मागणी हुजुरी पाठी संघटनेने एका निवेदनाद्वारे आज गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
हुजुरी पाठी संघटनेने निवेदनात असेही म्हटले आहे की टकसाल मधील जो कोणी प्रशिक्षणार्थी परीक्षा देत असेल त्यांना अमृतपान केल्याचे प्रमाणपत्र आणि हजूर साहिबचे रहिवासी प्रमाणपत्र आणि तकसालकडून मिळालेले धार्मिक शिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले पाहिजे आणि ज्या तकसाली विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा दिली आहे त्यांना गुरुद्वारा बोर्डाकडून आतापर्यंत कोणतेही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही त्यांना देखील तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे अशी देखील मागणी निवेदनात करण्यात आली असून या निवेदनावर अध्यक्ष हुजुरी पाठी संघटनेचे अध्यक्ष स.दलजीतसिंघ बीशनसिंघ हजुरी पाठी,उपाध्यक्ष स.प्रदिपसिंघ जीतसिंघ रागी,सचिव स.जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....
0 टिप्पण्या