🌟त्यांनी लिहिलेली विपुल ग्रंथसंपदा कवितासंग्रह महाराष्ट्रातील प्रत्येकाने वाचलेच पाहिजे🌟
महाराष्ट्र ही आदर्श राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तनवादी संत समाज सुधारक यांच्या विचारातून कार्यातून संस्कारीत झालेली ही भूमी त्यामुळे इतर राज्यापेक्षा पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जाते. महाराष्ट्राला सर्वांगीण दृष्ट्या सुसंस्कृत प्रगतिशील करण्यासाठी महापुरुष समाज सुधारक संत यांच्या योगदानाबरोबर मराठी साहित्याचे सुद्धा तितकच योगदान आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर,वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज व अनेक मराठी दिग्गज साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या द्वारे येथील समाज मनाची मशागत करण्याचं काम सातत्याने केले आहे.वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचं साहित्य क्षेत्रामधील योगदान काळाच्या कसोटीला उतरलेल आहे.त्यांच्याविषयी तत्कालीन प्रत्येक साहित्यिकांना व वर्तमान काळातील प्रत्येक साहित्यिकांना नितांत आदर होता व आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये वर्ग दहावीला पृथ्वीचे प्रेम गीत ही त्यांची कविता होती सूर्य आणि पृथ्वी खगोलशास्त्रीय असलेलं त्यांचं नातं त्यांच्या काव्यप्रतिभेमधून साकारलेलं युगा युगा पासून असलेलं आवीट नातं एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडलं महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता आणण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिल आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निस्सिम सहकारी भाऊराव गायकवाड उर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी कविता लिहून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला आहे.
मराठी साहित्य प्रांतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन उदयास आलेलं दलित साहित्य त्यामधले साहित्यिक जळगाव येथील 1983 मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष थोर साहित्यिक शंकरराव खरात आठवणीचे पक्षी या आत्मचरित्रपर पुस्तकांमधून साहित्य क्षेत्रामध्ये पदार्पण करणारे प्राचार्य प्र.इ. सोनकांबळे भारतीय दलित पॅंथर चळवळीतील अग्रणी रामायण आतील संस्कृती संघर्ष या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक अरुण कांबळे व जवळपास सर्वच दलित व नवेदित लेखक कवीसाठी कुसुमाग्रज आदराचे स्थान होते शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचे धडे कविता या मधून अनेक विद्यार्थ्यांनी धडा घेऊन जीवनामध्ये ते यशस्वी झाले अतिशय साधी राहानी व उच्च विचार सरनी असलेले वि वा शिरवाडकर यांचं नाशिक येथील निवासस्थान त्यांना भेटीस येणाऱ्यांसाठी सदा सर्वदा खुलं असायचं येणारे साहित्यिक मित्र ग्रंथप्रेमी वाचक रसिक सर्वांसोबत ते मन मुराद गप्पा मारायचे.
त्यांनी लिहिलेली विपुल ग्रंथसंपदा कवितासंग्रह महाराष्ट्रातील प्रत्येकाने वाचलेच पाहिजे अलीकडच्या काळामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे शासन पातळीवर वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे मोबाईल टीव्ही आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती हळूहळू नष्ट होती की काय अशा प्रकारची भीती वाटू लागली आहे वाचाल तर वाचाल या वचनानुसार थोर साहित्यिक वि वा शिरवाडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आपण असा संकल्प करूया मराठी साहित्य विश्व प्रग्ल्भ करणारे थोर साहित्यिक कवी नाटककार यांचे पुस्तके आपण वाचूया हीच खरी त्यांच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांना आदरांजली ठरेल....!
त्यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील व भारतातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा....!
श्रीकांत हिवाळे सर
मा.तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी.
0 टिप्पण्या