🌟19 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले🌟
परभणी : अभिजात भाषेचा आग्रह धरुन कोट्यावधी रूपयांचे प्रकल्प ऊभारणाऱ्या शासनाने बोलीभाषा समृध्दीचे ऊपक्रम राबविले पाहिजे असे रोखठोक प्रतिपादन इतिहास संशोधक डाॅ.अशोक राणा यांनी केले.
19 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल महात्मा फुले काॅलणी सभागृह येथे आयोजित नागरी सत्कार सैहळ्यात ते बोलत होते या वेळी पुढे बोलतांना त्यांनी ज्या राष्र्टांमध्ये बुध्द विचारांचा अंगीकार केला आहे त्या राष्टां मध्ये तुरूंग बंद करावे लागत आहेत कारण तिथे गुन्हेगारीचे प्रमाण अत्याल्प झाले असल्याची माहिती दिली.
या वेळी अध्यक्षस्थानी एन.आय.काळे तर प्रमुख अतिथीस्थानी डाॅ.सुरेश सदावर्ते,प्रेमानंद बनसोडे,सुनिल सौंदरमल,डाॅ.सुरेश हिवराळे,डाॅ.भीमराव खाडे,डाॅ.प्रकाश डाके,प्राचार्य नितिन लोहट,गौतम मुंढे,मिलिंद सावंत,सुरेश हिवाळे ऊपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सचिव यशवंत मकरंद यांनी
भोजनावळ्यांची चर्चा
हा प्रस्थापितांचा रिवाज आहे
एक रुपया मुठभर धान्य
हा विद्रोहाचा आवाज आहे...
या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष डाॅ.सुनिल जाधव तर आभार प्रदर्शन सहादु ठोंबरे यांनी केले या वेळी लाॅंगमार्च 2 मध्ये सक्रिय योगदान देणा-या सुधिर साळवे आणि अर्जुन पंडित यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा.डाॅ.सुरेश शेळके,रवि पंडित,सुनिल ढवळे,संजिव आढागळे,विनय मकरंद,संघपाल आढागळे आदिंनी परिश्रम घेतले विविध सामाजिक संघटनांच्या वतीने एम.एम.भरणे,अशोक कांबळे,भुषण मोरे,गोपिनाथ कांबळे,संजय बगाटे,दत्ता चव्हाण,प्रा.सावित्री चिताडे,प्रमोद अंभोरे,दिलिप बनकर,सुभाष पांचाळ यांनी डाॅ.अशोक राणा यांचा सत्कार केला.....
0 टिप्पण्या