🌟अमेरीकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 'गोल्ड कार्ड' योजना : अमेरीकेच्या नागरीकत्वासाठी मोजावे लागणार ४३ कोटी रुपये...!


🌟किमान एक दशलक्ष लोकांना 'गोल्ड कार्ड' दिले जाऊ शकते,अशी शक्यता यानिमित्ताने वर्तविली जात आहे🌟

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी देशातील अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू केली होती मात्र आता ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींना ५ दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास ४३ कोटी रुपये भरून अमेरिकेचे 'गोल्ड कार्ड' विकत घेता येणार आहे. आधीच्या 'ग्रीन कार्ड'ची जागा आता 'गोल्ड कार्ड' घेणार आहे. 

ओव्हल कार्यालयात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ही घोषणा केली.ट्रम्प यांनी 'गोल्ड कार्ड' हे 'ईबी ५' व्हिसा कार्यक्रमाला पर्याय असल्याचे म्हटले आहे आणि भविष्यात १ दशलक्ष 'गोल्ड कार्ड' विकले जातील, असे सांगितले. सध्या, 'ईबी-५' व्हिसा कार्यक्रम हा अमेरिकन नागरिकत्व मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी लोकांना सध्या १० लाख डॉलर्स (सुमारे ८.७५ कोटी रुपये) द्यावे लागतात.रशियन नागरिकांनाही 'गोल्ड कार्ड' देणार का, असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हो, रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत. किमान एक दशलक्ष लोकांना 'गोल्ड कार्ड' दिले जाऊ शकते, अशी शक्यता यानिमित्ताने वर्तविली जात आहे.

💫श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास अमेरिकेच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ :-

आधीच्या 'ईबी-५' योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यवसायात गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होते. १० लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन 'ग्रीन कार्ड' योजनेत द्यावे लागत होते. श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास अमेरिकेच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल, ते अधिक यशस्वी होतील, त्यांना इथले कर भरावे लागतील इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल ही योजना अभूतपूर्व असे यश मिळवेल यात शंका नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या