🌟कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेला आरोप खोटा- ना.राधाकृष्ण विखे पाटील

 


🌟सात हजार मतदारांची नोंदणी नियमानुसारच निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण🌟

मुंबई :- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत सात हजार मते वाढल्याचा सनसनाटी आरोप कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केला होता. हा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात ७ हजार मतदार एकाचवेळी वाढले अशी कुठलीही इमारत नसल्याचे स्पष्टीकरण राहता विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोरे यांनी मतदार नोंदणी करतांना कुठल्याही नियमांचा भंग झालेला नाही.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा करतांना काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीमध्ये ७ हजार नवीन मतदार वाढल्याचा आरोप केला होता. या संदर्भात आज शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांच्या आरोपात कुठलाही तथ्य नाही. या मतदारसंघात झालेली नवमतदार नोंदणी नियमानुसारच झाली आहे. भाजपला मिळालेल्या जनादेशाचे दुःख विरोधी पक्षाला आहे. जनाधार नसल्यामुळे विरोधी पक्षनेते खोटे-नाटे आरोप करुन जनतेसमोर येत असल्याचा पलटवार विखे पाटील यांनी केला. तर या संदर्भात या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. अस्थायी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्य आणि विद्यार्थी वस्तीगृहाच्या रेक्टरकडून दाखले मिळाल्यानंतरच नवमतदारांची नोंदणी झाली. यात कुठलाही नियम भंग झाला नसल्याचा दावा तहसीलदार मोरे यांनी केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या