🌟 हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची संभाजी सेनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟
(परभणीतील धार रोडवर अज्ञात समाजकंठकांच्या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेले निर्भिड सामाजसेवक अरुणभाऊ पवार)
परभणी :- परभणी येथील निर्भिड व धाडसी समाजसेवक तथा परभणी शहर संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यावर अज्ञात तिन ते चार समाजकंटकांनी दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास धार रोड वरून परभणी कडे येत असताना प्राणघात हल्ला केला.
अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या या प्राणघातक भ्याड हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ मार लागला त्यांच्या डोक्यात झालेल्या वारामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला त्यात त्यांना नऊ टाके बसलेले आहेत. त्यांच्यावर प्राण घातक हल्ला होऊन आज जवळपास तेरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही अद्यापपर्यंत हल्लेखोर पकडले गेले नाहीत निर्भिड समाजसेवक अरुण पवार यांनी गुटखाबंदी व वाळू तस्करी गोहत्या थांबवण्यासाठी परभणी शहरातील बंदिस्त कोल्ड कॅफे सेंटर इत्यादी विरोधात सातत्याने आंदोलने केलेली आहेत, वाळू माफिया कडूनच हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे तरी त्यांच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी संभाजी सेना व मराठा आरक्षणावर काम करणाऱ्या सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर संभाजीसेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, शिवसेना विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, संभाजी सेना जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख, लष्कर ए शिवबा मित्र मंडळ अध्यक्ष वसंत शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे, शिवमुद्रा संघटना संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत मोगल, जनहित मदत केंद्र अध्यक्ष कुणाल गायकवाड, संदीप मोरे, माधव थिटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या