🌟राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे नेते स.मनबीरसिंघ ग्रंथी यांची महानगर पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟
श्री हजुर साहेब नांदेड :- श्री हजुर साहेब नांदेड येथे प्रतिवर्षी होळी व बैसाखी सण साजरा करण्यासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा येथे हजारोच्या संख्येने देश विदेशातील हजारों तिर्थयात्री येत असतात याहीवर्षी पुढील महिन्यात मार्चमध्ये होळी व बैसाखी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने तिर्थयात्रेकरुंचे आगमन होणार असून गुरुद्वारा परीसरात अमृत योजनेच्या अंतर्गत मलनिसःरण वाहीणीचे काम झालेले आहे व त्या झालेल्या कामावर तात्काळ पॅचवर्क (पॅचप) करण्यात यावे तसेच हल्लाबोल महल्ला मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे व हल्लाबोल मार्गावर अतिरिक्त एल.ई.डी.लाईट (पथदिवे) बसवण्यात यावे जेणेकरून सणासुदीसाठी येणाऱ्या धार्मिक तिर्थयात्रींना त्रास होऊ नये यासाठी आज सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी नांदेड महानगर पालिकेचे उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली निवेदन देतेवेळी त्यांच्यासोबत स.जसपाल सिंघ लाखवाले यांची देखील उपस्थिती होती........
0 टिप्पण्या