🌟मुंबई उपनगर जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समिती सदस्यपदी रुग्णसेवक भिमेश मुतुला....!


🌟आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनाच्या सदस्यपदी निवड🌟

मुंबई : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनाच्या मुंबई उपनगर जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समिती सदस्यपदी रुग्णसेवक भिमेश मुतुला यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केली आहे.

 मुतुला हे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक सचिव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने त्यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र सरकारने गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गेल्या अनेक दिवसांपासून राबविले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या