🌟छ.संभाजी विद्यालय व पुर्णा शहरातील छत्रपती ॲटोमोबाईल्स शॉप यांच्या संयुक्त विद्यमाने वकृत्व स्पर्धेचे आयोजन🌟
पुर्णा (दि.०३ फेब्रुवारी २०२५) :- परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील छत्रपती संभाजी विद्यालय व पुर्णा शहरातील छत्रपती ॲटोमोबाईल्स शॉप यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमिताने दि.१८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती संभाजी विद्यालय सुहागण येथे विभागीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील वकृत्व स्पर्धेचे विषय आहेत १) धर्मनिरपेक्ष राजा शिव छत्रपती २) एकच राजा इथे जन्मला..... 3) दुर्गप्रेमी संरक्षक छत्रपती शिवराय ४) प्रजाहित दक्ष राजाः छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या निमिताने प्रथम पारितोषीक कै कौशल्याबाई लिंबाजी भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ भागवत शिंदेसर बलसा (बु) यांच्या कडून ३००१ व्दितीय पारितोषीक सरपंच प्रतिनिधी सुहागण दाजीबा भोसले यांच्या कडून २५०१ चौथे पारितोषीक आडत व्यापारी पूर्णा यांच्या विशाल चितलांगे यांच्या कडून १५०१ पाचवे पारितोषीक महाराष्ट्र पोलीस परभणी जगन्नाथ गोरखनाथ भोसले यांच्या वतीने १००१ गंगाधर किशन दहिवाळ बरबडी यांच्या कडून दोन बक्षिसे प्रत्येकी ५०० रू ठेवण्यात आले आहे तरी प्रत्येक शाळेतील फक्त १ स्पर्धक पाठवायचा आहे या बक्षिस वितरण सोहळ्यास उदघाटक म्हणून डॉ हरिभाऊ पाटील पूर्णा वितरण बाळा साहेब राखे विभागीय अध्यक्ष शिक्षक सेना गंगाखेड योगेश खंदारे ब्रँड अँबेसेंडर पूर्णा आदि उपस्थित राहणार आहेत तेव्हा या स्पधेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक हिराजी भोसले गणेश बुचाले मनोहर कल्याणकर गजानन भागवतसर गौतम वाघमारे सा बालाजी दैफळे सर यांच्या संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.....
0 टिप्पण्या