🌟भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा संपर्कमंत्र्यांची केली घोषणा....!


🌟बिड जिल्हा संपर्कमंत्री म्हणून ना.पंकजाई मुंडे यांची नियुक्ती🌟

मुंबई :- महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मंगळवार दि.०४ फेब्रुवारी २०२५ रोजी पक्षाच्या झालेल्या बैठकीत महायुती सरकार मंत्री मंडळातील भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडे संपर्कमंत्री म्हणून जवाबदाऱ्या दिल्या असून राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने बीड जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणुन जवाबदारी दिली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी राज्यातील जिल्हा संपर्क मंत्र्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या बैठकीत केली ज्या जिल्ह्यात महायुतीतील इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत तेथे भाजपने मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांकडे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे या मंत्र्यांकडे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे एकप्रकारचे पालकत्वच असणार आहे बीड जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान पक्षाने दिलेली ही नवीन जबाबदारी निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडणार असल्याचे ना.पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या