🌟चिखली येथील अनुराधा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य बालैय्या सर 'उत्कृष्ट प्राचार्य' पुरस्काराने सन्मानित.....!


🏆'उत्कृष्ट प्राचार्य' हा पुरस्कार त्यांना नुकताच पुणे येथे 'विवांत हॉटेल हिंजेवाडी' येथे प्रदान करण्यात🏆

✍️ मोहन चौकेकर                    

चिखली :  चिखली येथील अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य  बालैयागंगार बोईना यांना  स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार 2025, उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल 'उत्कृष्ट प्राचार्य' हा पुरस्कार नुकताच पुणे येथे 'विवांत हॉटेल हिंजेवाडी' येथे प्रदान करण्यात आला बालय्या सर हे मागील वर्षी अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्राचार्य पदावर रुजू झालेले असून अतिशय कमी वेळात त्यांनी शाळेची प्रगती आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्तमरीत्या केलेली आहे आणि आजही वेगवेगळ्या शैक्षणिक योजना अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राबवित असून विद्यार्थ्यांना दर्जेदार असे विज्ञान व गणित विषयाचे उत्तम मार्गदर्शनही करत आहेत. 

 बालैयासरांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा विकास, शाळेचा विकास हे ध्येय मनात बाळगून सर अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलच्या लौकिकात उत्कृष्ट कामगिरी करून भर घालत आहेत. सरांच्या यशाबद्दल अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीच्या अध्यक्षा ॲडवोकेट वृषालीताई बोंद्रे, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  राहुलभाऊ बोंद्रे तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. रवींद्र इंगळे सर, विश्वस्त  वानरे सर, संस्थेच्या मार्गदर्शक सल्लागार सुजाता कुल्ली मॅडम व सर्व संस्थांच्या प्राचार्यांनी तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, इतर कर्मचारी यांनी व सर्वात लाडके असे सरांचे सर्व विद्यार्थी वर्ग यांनी सरांना मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत......                        

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या