🌟परभणीतील संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार जीवघेणा हल्ला प्रकरणातील हल्लेखोर अद्यापही फरार....!


🌟परभणी जिल्हा संभाजी सेनेने दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा🌟

परभणी :- परभणी येथील निर्भिड व धाडसी समाजसेवक तथा परभणी शहर संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यावर अज्ञात तिन ते चार समाजकंटकांनी दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास धार रोड वरून परभणी कडे येत असताना प्राणघात हल्ला केल्याची भयावह घटना घडली होती या घटनेला जवळपास पंधरा दिवसांच्या वर कालावधी उलटल्यानंतर देखील या घटनेतील हल्लेखोरांचा तपास लावण्यात परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही.

अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या या प्राणघातक भ्याड हल्ल्यात समाज सेवक अरुण पवार यांच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ भयंकर मार लागला त्यांच्या डोक्यात झालेल्या वारामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला त्यात त्यांना नऊ टाके बसलेले आहेत. त्यांच्यावर प्राण घातक हल्ला होऊन आज जवळपास सतरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही अद्यापपर्यंत हल्लेखोर पकडले गेले नाहीत निर्भिड समाजसेवक अरुण पवार यांनी गुटखाबंदी व वाळू तस्करी गोहत्या थांबवण्यासाठी परभणी शहरातील बंदिस्त कोल्ड कॅफे सेंटर इत्यादी विरोधात सातत्याने आंदोलने केलेली आहेत, वाळू माफिया कडूनच हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

 त्यामुळे संदरील घटनेतील समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी परभणी जिल्हा संभाजी सेनेच्या वतीने आज सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'धरणे आंदोलन' करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आले आहे जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस प्रशासन घटनेतील हल्लेखोरांना अटक करण्या संदर्भात कोणते ठोस पाऊल उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या