🌟दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तावीस वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर भाजपचे कमळ फुलले🌟
नवी दिल्ली :- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जसाजसा लागण्यास सुरुवात झाली तसतसे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच दिल्लीतून सत्ता गेली आहे दिल्लीची तब्बल दहा वर्षे सत्ता भोगलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीतील जनतेने सपशेल नाकारले आहे तर भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या आम मतदार जनतेने एकहाती सत्ता देऊन सत्ता परिवर्तन घडवले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे केजरीवाल यांचं काय होणार अशी चर्चा असतानाच आता अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली आहे 'आप'साठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४७ जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल २७ वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. जंगपुरा मतदारसंघात भाजपाच्या तरविंदर सिंग मारवाह यांचा ६०० मतांनी विजय झाला आहे. तसेच राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे जे जिंकले त्यांचे मी अभिनंदन करतो नेमके काय घडलं त्याबाबत आत्मपरीक्षण करु, असं मनीष सिसोदिया म्हणाले. तसेच पराभवाच्या छायेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झाला आहे. त्या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. आतिशी यांनी शेवटच्या फेरीत आघाडी घेतली आणि त्या २७०० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रमेश बिघ्री यांचा पराभव केला आहे. तर मालवीय नगरमधून आपच्या सोमनाथ भारती यांचाही पराभव झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तब्बल २७ वर्षानंतर कमबॅक केले आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ४८ तर दहा वर्ष सत्ता उपभोगलेल्या आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक इंडिया आघाडी द्वारे लढविणाऱ्या काँग्रेसने या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेवून इंडिया आघाडी बासनात गुंडाळणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळू शकली नाही.
💫आम आदमी पार्टीच्या कार्यालयात भयानक शुकशुकाट तर भारतीय जनता पक्षाच्या गोटात जल्लोष :-
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या या पराभवानंतर आम आदमी पार्टीच्या सर्वच कार्यालयांमध्ये भयान शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दिल्ली निवडणुकीत खराब कामगिरीमुळे आपने कार्यालयाला आतून टाळे ठोकले आहे आपच्या पक्ष कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
💫मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ३१८६ मतांनी पराभव :-
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी ३१८६ मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच मनीष सिसोदिया याचाही पराभ झाला आहे....
0 टिप्पण्या