🌟पुर्णा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मुजीब कुरेशी यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन🌟
पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी २०२५) :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न पुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती शहरातील पत्रकार भवनात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय बराटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पुर्णा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मुजीब कुरेशी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक जगदीश जोगदंड यांनी केले तर सूत्रसंचालन दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी प्रा.प्रदीप कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष मोहन लोखंडे यांनी मानले......
0 टिप्पण्या