🌟निलंगेकर कुटुंबाचे मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून सांत्वन....!


🌟राज्याचे मा.मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी.स्व.सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचे नुकतेच निधन झाले🌟


 
काँंग्रेस पक्षाचे निष्ठावंत आदर्श नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी.स्व.सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री दुःखद निधन झाले त्याबद्दल राष्ट्रवादी काँंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते. मराठवाडा. शिक्षक. आमदार. विक्रम काळे साहेब यांनी निलंगा येथील" अशोका " निवासस्थानी निलंगेकर कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले तत्पूर्वी दिवंगत स्व. सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले...परिवारातील सदस्य. महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. विजय अंकल पाटील निलंगेकर, भाजपाचे युवा नेते. अरविंदभैय्या पाटील निलंगेकर यांच्यासह निलंगेकर परिवारातील सदस्यांचे सांत्वन केले यावेळी श्री.तानाजीराव पाटील,राजकुमार मगर,माजी मुख्याध्यापक. दिलीपराव धुमाळ उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या