🌟शिवरायांच्या प्रशासनातील समानता आणि आजची विषमता.....!


🌟अखिल विश्वाला प्रेरणा देणारं वेक्तिमत्व म्हणजे राजांचा राजा शिवछत्रपती होय🌟


✍️लेखिका : पि.आर.डंबाळे

इतिहास हा माणसाला प्रेरणा देतो. जगण्याचं आणि लढण्याचं बळ देतो. आयुष्य जेव्हा संकटात असतं तेव्हा त्या संकटाला भिडुन  "विजयश्री " खेचून आणण्याचं सामर्थ्य इतिहासात असतं. इतिहासातील असंच एक अखिल विश्वाला प्रेरणा देणारं वेक्तिमत्व म्हणजे राजांचा राजा शिवछत्रपती होय. अशा पावन भूमीत आपला जन्म झाला खरंच हे आपले भाग्य म्हणावं. पण याचं पावन भूमीत अशी काही माणसे जन्म घेतात ज्याने ही माती दूषित होते. आणि ते पाप धुण्यासाठी गंगेत जातात पण गंगेलाही ही लोक अपवित्र करुण येतात कारण पावित्र्य हे अंतरमनात असावं लागतं ते डोळ्यात झळकावं लागतं आणि कृतीत उतरावं लागतं. जे शिवरायांच्या प्रशासनात दिसुन येतं. राजेंनी अठरापगड जातींना एकत्र करुण लोकशाही राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करुण सर्व जनतेला न्याय दिला. जात, धर्म, पंथ प्रांत याचा विचार न करता सर्वाना समान न्याय दिला. स्वराज्यांचे प्रशासन न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, या अलंकारांनी सुशोभीत झालेले होते. पण आजच्या स्थितीचा विचार करता याच शिवरायांच्या स्वराज्यात विषमतेच्या आधारे निर्णय दिले जातात. प्रशासन हे कुटनितीने चालवले जाते पण आज कुटनितीच्या ऐवजी कुटीलनीतीचा अवलंब केला जात आहे. हिरकणीने नियम मोडला पण त्यापाठीमागे तीची सदभावना विचारात घेऊन शिवरायांनी तीला शिक्षा तर केलीच नाही याउलट तीचा सन्मान केला. आणि इतिहासाने त्यांची गणना "स्त्रीसन्मानक राजा "म्हणून केली. पण आज याचा विसर कुठे तरी पडताना दिसुन येतं आहे. एक हिरकणी जिचा सन्मान शिवरायाने केला. आणि एक आजची सबला नारी जी सत्यासाठी संघर्ष करत असताना तीला खोटं ठरवलं जात. तरीही ती कायद्याने लढते. पण सत्तेचा माज असणाऱ्याना कायदा कधी पटत नाही कारण कायदा हा सत्तेपेक्षा सर्वश्रेष्ठ असतो. आणि हो सत्य असतो. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाशी "चर्चा" करुण त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले यापाठीमागे "सर्वाना न्याय मिळावा " हा उदात्त हेतू होता. मात्र याउलट आज शासन व शासनाचे सहाय्यक यांना अंधारात ठेऊन "चर्चेद्वारे " कपटनितीचा अवलंब करुण प्रामाणिक आणि सच्या वेक्तीना काढल्या जातं. आणि इथेच लोकशाहीची हार होते. पण कटकरस्था रचून मिळवलेला विजय हा पराजयकडे नेणारा असतो. तो जास्त काळ टिकून राहत नाही. एक लेखणी त्याला नेस्तनाबूत करू शकते एवढे सामर्थ्य लेखणीचे असते. शिवरायांनी प्रत्येक वेक्तीची क्षमता ओळखून न्याय दिला. त्यामुळे स्वराज्य अटकेपार पोहनचू शकले. पण आज प्रशासनामध्ये जेव्हा एखादा वेक्ती आपल्या पदापेक्षा जास्त क्षमतेने काम करत असेल तर त्याला खेचणारी कुप्रवृत्ती आपल्याला फोफावताना दिसतं आहे. शिवराय जे आदेश देत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे आवश्यक असे. पण आज शासन जो शासन निर्णय निर्गमित करते त्याचा वापर आपल्या सोयीप्रमाणे करुण प्रामाणिक आणि सच्या वेक्तीना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक केल्या जातो. ही वस्तूस्थिती नाकारता येतं नाही. प्रशासन हे शासनाचं प्रतिबिंब असतं. महापुरुष यांचे विचार कर्मचारी अधिकारी यांच्या मध्ये रुजावेत आणि त्यांनी न्यायपूर्ण असे प्रशासन करावे. कामाची गती वाढावी आणि आणि एकमेकांच्या प्रति आदर प्रेम आणि सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रत्येक कार्यालयात जयंत्या साजऱ्या केल्या जातात. पण खरंच आज एक माणूस म्हणून याचा विचार करणे गरजेचे आहे. लोभ आणि वर्चस्ववादी प्रवृत्ती माणसाला माणसापासून दूर नेते. या शिवजयंतीच्या निमित्याने दोन विचारधारा माणसे एकत्र आली तर ही जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल....

✍️लेखिका : पि.आर.डंबाळे 

संचलिका 

26 जानेवारी संविधान विचारमंच

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या