🌟मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ४ नक्षलवादी ठार.....!


🌟पोलिस चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश🌟

बालाघाट : मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात काल बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी पोलिस दलाशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असून त्यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले बालाघाट जिल्ह्यातील जंगलात ही चकमक उडाली. राज्य पोलिसांचा नक्षलविरोधी हॉक फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम हाती घेतली होती. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी एक रायफल, एसएलआर, ३०३ रायफल आणि दैनंदिन वापराचे साहित्य जप्त केले. जंगलात पसार झालेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची १२ पथके तैनात करण्यात आली होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या