🌟सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही🌟
बिड :- राज्यातील मराठवाडा क्षेत्रातील शेतकरी बांधवांना कमी पर्जन्यमानामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे मराठवाड्यातील येणाऱ्या नवीन पिढीसाठी संपूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे अशी महत्वपूर्ण घोषणा घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बुधवार दि.०४ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसिंचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ना.पंकजा मुंडे, या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे आष्टीचे आ. सुरेश धस, खा. बजरंग सोनवणे, आ. संदीप क्षिरसागर आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्यात सिंचनाअभावी सातत्याने दुष्काळग्रस्त राहिलेला आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने निर्धार केला आहे. त्यातूनच पश्चिम वाहिण्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी पात्रात आणण्याच्या योजनेला केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यामुळे नेहमी दोन-तीन टीएमसी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मराठवाड्यातील गोदावरी पात्रात ५६ टीएमसी पाणी मिळणार आहे. बीड जिल्ह्याचा एक वैभवशाली इतिहास आहे. या जिल्ह्याने प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्यासारखे दुरदर्शी नेते राज्याला दिले आहेत. अलिकडच्या काळात बीड जिल्ह्याचा उल्लेख अत्यंत वाईट पध्दतीने घेतला जात आहे. परंतु सरपंच हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली........
0 टिप्पण्या