🌟लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करुन अर्पण केली श्रध्दांजली🌟
मुंबई (दि.१९ फेब्रुवारी २०२५) :- महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आज १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी केली जात असतांना व संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले जात असतांना मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते नेते खासदार राहुल गांधी यांनी मात्र अकलेचे तारे तोडत आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना चक्क श्रध्दांजली अर्पण केल्याने तिव्र असंतोषाचे वातावरण पसरले असून भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी खासदार राहुल गांधी यांनी तात्काळ ट्विट मागे घ्यावे अशी मागणी केली असून अन्यथा कायदेशीर कारवाईचा देखील इशारा दिला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असो की अन्य महापुरुष त्यांना जयंती दिनी आदरांजली अर्पण केली जात असते परंतु लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या खा.राहुल गांधी यांना एवढं देखील भान राहिलं नाही की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना चक्क जयंती दिनी श्रध्दांजलीच अर्पण केली कॉंग्रेस पक्षाची संस्कृतीच आहे की ते नेहमीच देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील महापुरूषांच्याविषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात हा त्यातलाच एक गंभीर प्रकार आहे हे ट्विट मागे घ्यावं आणि आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देत भाजप नेते अतुल भातखळकरांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही एक्स अकांउंटवरून राहुल गांधी यांना जयंतीला अभिवादन करतात हे सांगत माफी मागण्याची मागणी केली केली आहे......
0 टिप्पण्या