🌟मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यालयाने वृत्त नाकारलं ?🌟
✍️ मोहन चौकेकर
बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणावरुन एकमेकांच्या विरोधात गेलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे एका खासगी रुग्णालयात आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची ही भेट झाल्याचे सांगण्यात येते आहे साधारण चार पाच दिवसांपूर्वी ही भेट झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांची हत्याप्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड हे सध्या कोठडीत आहेत.
भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं असताना, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. मात्र आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे व आश्चर्य देखील व्यक्त होते आहे दरम्यान या भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, "सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, हे सर्व सरप्राईजिंग आहे. माझ्या माहितीनुसार भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली आहे पण ही अतिशय गंभीर बाब आहे"
💫आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया :-
आमदार सुरेश धस म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यादिवशी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी झाकून-लपून नाही तर त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात गेलो होतो. त्यांच्या विरोधातील लढा आणि भेट या वेगळ्या गोष्टी आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी आता भेट होईल पर्वा भेटलो ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो होतो.
💫मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यालयाने वृत्त नाकारलं ? :-
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने भेटीच्या वृत्ताचं खंडण करण्यात आलं आहे. अशी कोणतीही भेट झालेली नसल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
💫चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले ? :-
आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो, सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. दोघेही इमोशनल आहेत.दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले.धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे.आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत.
💫धनंजय देशमुख काय म्हणाले ? :-
धनंजय देशमुख म्हणाले आमदार सुरेश धस यांची भूमिका न्यायाची आहे ते आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आशा आहे.
💫अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया :-
अंजली दमानिया म्हणाल्या, मला देखील चार ते पाच दिवसांपूर्वी असं समजलं होतं की, दोघांची भेट झाली. मात्र, मला असं सांगण्यात आलं होतं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली. पण अशी भेट झाली असेल तर फार दुर्दैवी आहे. कारण आता सुरेश धस मग त्यांच्याविरोधात लढतील की नाही? हे सर्व मला विक्षिप्त वाटतं आहे. आकाचा आका आहे वगैरे बोलत होते. आताच्या घडीला हे समोर येत असेल तर कठीण आहे. हे अतिशय चुकीचं आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या