🌟राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली माहिती🌟
छत्रपती संभाजीनगर :- प्रत्येक महिला संसार करताना 'अर्धांगिनी' संबोधली जाते परंतु पतीच्या निधनानंतर ती संसारात एकटीच कुटुंबाची जबाबदारी सांभाळते त्यामुळे तिला यापुढे 'विधवा' न संबोधता तिला 'पुर्णांगिनी' म्हणून तिचा सन्मान करावा असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे केले.
संबोधनातील हा बदल करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाने शासनाला शिफारसही केली असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर असेही म्हणाल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने जिल्ह्यात 'महिला सक्षमीकरण अभियान' राबविण्यात येत आहे त्या अभियानांतर्गत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 'महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा' आयोजित करण्यात आली.....
0 टिप्पण्या